वागदरी गावात सामूहिक वाहन पूजन ; मिटकर कुटुंबीयांचा उपक्रम कौतुकास्पद- महंत इच्छागिरी महाराज
नळदुर्ग,दि.०३ नोव्हेंबर : नवल नाईक
दिवाळीच्या सणाला प्रत्येक जण आपापल्या घरी वाहनांची पूजा करत असतो, परंतु वागदरी गावांमध्ये मिटकर कुटुंबीयांनी सामूहिक वाहन पूजनाचा केलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत तुळजापूर येथील सोमवार गिरी मठाचे मुख्य महंत इच्छागिरी महाराज यांनी व्यक्त केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी चौकातील मुख्य ध्वजारोहणानंतर गावातील सर्व प्रकारची वाहने वाजत गाजत,फटाक्यांच्या आतिषबाजीत,हलग्यांच्या कडकडाटात महादेव मंदिरात एकत्र आणली गेली.राज्य पोलीस प्राधिकरणाचे श्री.उमाकांत मिटकर व महाराजांच्या हस्ते मंत्रोच्चारात सर्वांचे सामूहिक वाहन पूजन झाले. सर्व वाहनचालकांना मानाचा पंचा दिला गेला.महादेव मंदिरात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उत्कृष्ट सजावट केलेल्या टुव्हिलर, फोर व्हीलर व इतर अवजड वाहनांना प्रत्येकी तीन हजारांची तीन बक्षीसही देण्यात आली. टू व्हीलर मध्ये श्री.मदन चव्हाण,ट्रॅक्टर मध्ये श्री.नेताजी वचणे, अवजड वाहनांमध्ये श्री.दिगंबर गायकवाड यांनी क्रमांक पटकावला.कार्यक्रमाची बक्षिसे,उपरणे व इतर खर्चाचे प्रायोजकत्व सरपंच तेजाबाई मिटकर यांनी घेतले होते
या कार्यक्रमासाठी जळकोट येथील श्री.सचिन कदम चेअरमन,प्रयाग मल्टीस्टेट,श्री.ब्रम्हानंद कदम ,संचालक पार्वती कन्या प्रशाला,श्री.प्रमोद सावंत, एच.आर.हेड, एमक्यूअर फार्मास्यूटिकल पूणे.श्री.श्रीकृष्ण कदम सहशिक्षक,श्री.दिनकर कलाल,संचालक ज्ञानदीप क्लासेस,श्री.श्रद्धानंद स्वामी मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती.यांनीच वाहनांचे परीक्षण केले.या कार्यक्रमाला गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.