श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी  पुण्यस्मरण उत्सवानिमित्त आध्यात्मिक प्रवचनास प्रारंभ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते आरती,पुजन

नळदुर्ग, दि.०८

  श्री शिवलिंगेश्वर मठात श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पुण्यस्मरण उत्सवानिमित्त गुरुवारपासून आध्यात्मिक प्रवचनास उत्साहात सुरुवात झाली आहे. 

 प्रारंभी मान्यवराच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.  प्रवचन कार्यक्रम दरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग मठास भेट देऊन महाराजांची आरती करुन पूजन केले. यावेळी  प्रवचनकार नळदुर्गचे मठाधिपती  श्री बसवराज शिवाचार्य महाराज, श्री.शांतवीर शिवाचार्य महास्वामीजी, गडी गौडगाव, श्री.मृगेंद्र महाराज महास्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले.याप्रसंगी मठाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने आमदार पाटील यांचा सत्कार केला.
या आध्यात्मिक प्रवचनास श्री डॉ. चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ हरकुड, श्री महांत महास्वामीजी मैदगी, श्री डॉ शांतवीर शिवाचार्य महास्वामीजी गडी गौडगाव, अभियंता श्री स्वप्नील काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संतोष बोबडे, ॲड नितीन काळे, सचिन पाटील,दयानंद स्वामी, दत्तात्रेय कोरे, मल्लिनाथ माळगे, बसवराज धरणे, महालिंग स्वामी, विनायक अहंकारी, ज्योती बचाटे, महेश कोप्पा पाटील, शरणु शंकरशेट्टी, सिद्धू मानशेट्टी, सोनू मुळे, धीरज शंकरशेट्टी, सोमनाथ कसेकर, बंडू कसेकर, संतोष वाले ऋतुराज बाळूरकर सागर मुळे,धिमाजी घुगे श्रमिक पोतदार , पद्माकर घोडके, गणेश मोरडे, , विजय ठाकूर, आकाश कुलकर्णी, मुन्ना वाले ,वीरेंद्र बेडगे, प्रमोद कोकणे, संजय जाधव, अजय दासकर, बबन चौधरी, अक्षय भोई ,रवी ठाकूर ,आकाश घोडके, गजू हळदे,आदिसह अक्कनबळग महिला मंडळाच्या  सर्व सदस्या , वीरशैव लिंगायत समाजाचे युवक व भक्तगण उपस्थित होते.
यावेळी बसवण्णी शिवयोगी कुलकर्णी बेळगाव, श्रीशैल व्हडंरे उमरगा, गुरुराज माळगे गुलबर्गा यांच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय कोरे तर आभार मल्लिनाथ माळगे यांनी मानले.

यावेळी ब्राह्मण समाजाचे पांडुरंग कुलकर्णी, उत्तम रामदासी, सुधीर पुराणिक, बाळासाहेब कुलकर्णी, शशिकांत नाईक, सुभाष भुमकर, नंदकुमार जोशी त्याचबरोबर राजपूत समाजाचे सुधीर हजारे, सरदारसिंग ठाकूर, छबुसिंग बिसेनी, मनोज हजारे, बलदेव ठाकूर, राहुल हजारे ,रणजितसिंग ठाकूर आदींचे विशेष सत्कार करण्यात आले.
 
Top