ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची हजेरी
नळदुर्ग, दि.०८
नळदुर्ग येथिल मराठा गल्लीत सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देवुन दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी आमदार पाटील यांनी आयोजक व वारकरी यांच्यांशी संवाद साधत मागील पाच दशकात पारायण सोहळ्याच्या वाटचालीची माहिती जाणून घेतली.
यावेळी बलभीम मुळे, सुधीर हजारे, तानाजी जाधव, विलास येडगे, सुहास येडगे उदय जगदाळे, दत्तात्रय कोरे नय्यर जागीरदार, धीमाजी घुगे, पांडूरंग पुदाले, श्रमिक पोतदार, पद्माकर घोडके, संजय विठ्ठल जाधव, बंडू पुदाले, गणेश मोरडे, विजय ठाकूर, आकाश कुलकर्णी, अजय दासकर, ओम बागल, विशाल डुकरे, सुनील चौधरी मुन्ना वाले, सागर हजारे, मयूर महाबोले, श्याम बागल, अक्षय भोई, वीरेंद्र बेडगे, रवी ठाकूर, शिवाजी सुरवसे, शिरीष डुकरे, प्रशांत पवार यांच्यासह वारकरी, महिला भाविक व शिवशाही तरूण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.