माजी नगरसेविका श्रीमती छमाबाई धनराज राठोड यांची निवड झाल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून गौरव 

नळदुर्ग,दि.२९:

संपूर्ण भारत जन कल्याणकारी योजना प्रसार व प्रचार अभियान (आर एम एस एस) महिला धाराशिव जिल्हाध्यक्षपदी नळदुर्ग येथील माजी नगरसेविका श्रीमती छमाबाई धनराज राठोड यांची निवड झाल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी धाराशिव येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी निवड झाल्याचे पत्र श्रीमती राठोड यांना देण्यात आले.
केंद्र सरकारच्या असंख्य जनकल्याणकारी योजनांची माहिती श्रीमती राठोड या जनसामान्यांपर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे. याप्रसंगी भाजपचे नळदुर्ग शहराध्यक्ष धिमाजी घुगे, माजी नगरसेवक विनायक अहंकारी,  सौ. जयश्री राठोड,  प्रशांत राठोड, सौ. रेखा राठोड, देविदास जाधव यांच्यासह कार्यकर्ते 




(RMSS) राष्ट्रीय- मोदी सेवा समिती- संपूर्ण भारत संघठन भारतीय जनता पार्टी- दिल्ली- प्रचार- प्रसार जनकल्याणकारी अभियान- संपूर्ण भारत संघठन-  अंकुश जाधव-महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आर एम एस एस संपूर्ण भारत संघठन, प्रचार प्रसार भारतीय जनता पार्टी
 
Top