बालाघाट महाविद्यालयाच्या विद्यार्थी कलावंताचे युवा महोत्सवात यश
नळदुर्ग,दि.२९: प्रा.डॉ.दिपक जगदाळे
येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी कलावंतांनी छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवात लोक आदिवासी नृत्य या प्रकारात प्रथम तर लोकगीत या प्रकारात द्वितीय क्रमांकाचे यश मिळविल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. युवक महोत्सवात यश संपादन केलेल्या विद्यार्थी कलावंताचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व संचालक बाबुराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी नेहमी धडपड केली पाहिजे तरच यश मिळू शकते हे सर्व तुमच्या परिश्रमाचे श्रेय आहे .ग्रामीण भागामध्ये आपल्या आवतीभोवती अनेक लोककला आहेत की ज्या लोप पावत जातात कि काय अशी शंका असताना युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी कलावंतांच्या द्वारे ही कला जोपासली जाते आहे याचा आनंद होत आहे. या लोककलांनी पूर्वीपासून चालत आलेली पारंपारिकता खऱ्या अर्थाने जोपासली पाहिजे व ती विद्यार्थी कलावंतांनी लोक आदिवासी नृत्य, लोकगीत, भजन अशा कला प्रकारातून जतन करताना दिसून येते आहे याचे कौतुक करत विद्यार्थी कलावंताना प्रोत्साहन दिले.
महाविद्यालयातल्या विद्यार्थी कलावंतांनी लोक आदिवासी नृत्य, लोकगीत, लावणी, समूह गायन, सुगम गायन, भजन, वक्तृत्व, काव्यवाचन, रांगोळी, कोलाज, चित्रकला, प्रश्नमंजुषा अशा १२ कला प्रकारात आपला सहभाग नोंदवून सादरीकरण केले. महाविद्यालयातील रामकृष्ण चव्हाण, रुपेश चव्हाण, अर्चना चव्हाण, किर्ती इटकरी, वैष्णवी सुतार, सुधामती काळे, वृषाली गायकवाड, मुस्कान शेख, श्वेता नाईक, अनुष्का सोनवणे, सोनाली काळे या विद्यार्थी कलावंतांनी सहभाग घेऊन आपल्या कलेचे उत्कृष्ठ सादरीकरण करून यश मिळविले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड , कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शाखाली सांस्कृतिक विभागातील प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी कलावंतांचे व मार्गदर्शकांचे संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण, सचिव उल्हास बोरगावकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, कोषाध्यक्ष प्रदीप मंटगे, सहसचिव शहबाज काझी, लिंबराज कोरेकर, प्रकाशराव चौगुले, बाबुराव चव्हाण प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.