उमरगा लोहारा विधानसभा पत्रकार महासंघाच्या अध्यक्षपदी महेश निंबरगे तर उपाध्यक्षपदी  सुनील ठेले

लोहारा,दि.०७:

उमरगा लोहारा विधानसभा पत्रकार महासंघाची कार्यकारणी नव्याने जाहीर करण्यात आले असून या महासंघांच्या अध्यक्षपदी मुरूम येथील पत्रकार महेश निंबरगे तर उपाध्यक्षपदी लोहारा येथील पत्रकार सुनील ठेले आणि दाळिंब येथील अस्लम शेडेवाल यांची निवड करण्यात आली आहे.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी ६ जानेवारी रोजी उमरगा येथे शांताई मंगल कार्यालय येथे  कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली.. सदरच्या कार्यकारणीत सचिव पदी सुमित झिंगाडे,व सहसचिव म्हणून अब्बास शेख तसेच सल्लागार म्हणून रफिक पटेल,अशोक दुबे,रवी आंबूसे,यशवंत भुसारे,हणमंत शंके,तानाजी माटे यांची निवड करण्यात आली आहे.या महासंघात मोहन जाधव,नहीरपाशा मासूलदार,संभाजी पाटील,आदम पठाण,जसवंतसिंह बायस,जगदीश सुरवसे,अजिंक्य मुरूमकर, मोहन जाधव,राजेंद्र घोडके,निजगून स्वामी,रामचंद्र गायकवाड, सुनील सोमवंशी,इम्रान सय्यद,मल्लिनाथ सूपतगावे,अमोल गायकवाड,हुसेन नूरसे,इम्रान सय्यद,अमित राजपूत ,मल्लिनाथ गुरवे यांची सदस्य पदी निवड करण्यात आले.
 
Top