इटकळ पत्रकार संघाचे उपक्रम कौतुकास्पद - माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन; उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या ३१ मान्यवराना पुरस्कार प्रदान
इटकळ ,दि.७: दिनेश सलगरे
इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे गेल्या चौदा वर्षांपासूनचे सर्वच उपक्रम वाखाणण्याजोगे व कौतुकास्पद असून त्यांच्या सकारात्मक लिखाणामुळेच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास होत असल्याचे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिनदर्शिका प्रकाशन व वारकरी संप्रदाय व युवा उद्योजक पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.
रविवार दि.५ जानेवारी रोजी इटकळ येथील विवांता रिसॉर्ट येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व वारकरी संप्रदाय व युवा उद्योजक यांचा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले .
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी हभप. दिंडेगावकर महाराज , माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर , माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत वडगावे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे , डॉ.जितेंद्र कानडे , डॉ .राजाराम शेंडगे , डॉ नागनाथ कुंभार , पोलिस उपनिरीक्षक महेश घोडके , युवा नेते ऋषी मगर , बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के , उपसरपंच फिरोज मुजावर , पोलीस पाटील विनोद सलगरे, सरपंच मल्लिनाथ गावडे , साहेबा क्षिरसागर, तंटामुक्त समिती अध्यक्ष विकास पाटील, सरपंच नागनाथ घोडके , सर्वेश्वर पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद काळुंके यांनी केले. ग्रामीण पत्रकारांच्या समस्या व त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनी सविस्तरपणे उपस्थितासमोर मांडल्या .
सन्मानपत्र , फेटा , शाल , पुष्पगुच्छ , पुस्तक , पेन देऊन वारकरी संप्रदायातील व उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी बजावलेल्याचा सन्मान करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यासाठी परिसरातील राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , वारकरी संप्रदाय , व्यापारी व अणदूर येथील जय मल्हार पत्रकार संघाचे सर्व सदस्य तसेच इटकळ परिसरातील सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचलन दिनेश सलगरे यांनी तर आभार चांदसाहेब शेख यांनी केले.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष दिनेश सलगरे , उपाध्यक्ष लियाकत खुदादे , केशव गायकवाड , चांदसाहेब शेख , नामदेव गायकवाड , बालाजी गायकवाड यांनी पुढाकार घेतले.