समस्यांचे निराकरण करणारा दुवा म्हणजे पत्रकारच: लक्ष्मण नरे
तुळजापूर ,दि.०७
पत्रकार हा विविध क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करणारा दुवा असला तरी तोच आज मात्र आडगळीला पडला असून समाजमनात पत्रकाराबद्दल खऱ्या अर्थाने सहनभुती व पाठबळ देण्याची भावना उरली नसल्याची खंत श्री श्री गुरुकुल चे मुख्याध्यापक तथा पत्रकार लक्ष्मण नरे यांनी व्यक्त केले. ते तुळजापूर तालुका व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंग च्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.
प्रारंभी दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री, चंद्रकांत हगलगुंडे, श्रीकांत अणदूरकर , चंद्रकांत गुड, दयानंद काळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन तोग्गि, शिवशंकर तिरगुळे, सचिन कंदले, संजू आलूरे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना चंदू गुड म्हणाले की, पत्रकार हा नेहमी अन्याय,अत्याचार, भ्रष्टाचार यांच्या विरोधात आवाज उठवून सर्वसामान्यांना न्याय व प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम करतो. पत्रकारांना कधीही,कशाचीही प्रसिद्धीची वा प्रतिष्ठेची हव्यास नसल्याचे सांगून तन मन धन अर्पित करण्याचे सामर्थ्य केवळ पत्रकारातच असल्याची भावना दैनिक सकाळचे बातमीदार चंदू गुड्डू यांनी व्यक्त करून व्हाईस ऑफ मीडिया संघटनेने ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करून वेगळा आदर्श व पायंडा निर्माण केल्याचे सांगून संघटनेचे कौतुक केले.