पुणे येथे आयोजित भारतीय संविधान अमृत महोत्सव संमेलनात डॉ डी.टी.गायकवाड यांच्या पुस्तकाचे प्रकाशन 

वागदरी/पुणे: एस.के.गायकवाड:

पुणे येथे आयोजित भारतीय संविधान अमृत महोत्सव संमेलनात डॉ डी.टी.गायकवाड यांच्या पुस्तकाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.

शनिवार दि.४ जानेवारी २०२५ रोजी बहुजन हिताय बहुजन सुखास ग्रुप शिक्रापूर पुणे, भारतीय संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे व समिक्षा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे भारतीय संविधान अमृत महोत्सव संमेलन टिंगरे नगर येथील बौद्ध विहारात आयोजित करण्यात आले होते.


   या संमेलनाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या विमल बाबुराव गायकवाड ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जेष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस हे होते.तर यावेळी साहित्यिक  राष्ट्रीय प्रबोधनकार प्रा.दि.वा.बागुल,डॉ.डी.टी.गायकवाड, अनंत भवरे, रेखाताई ढेकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून या संमेलनाची सुरुवात  झाली.
 याप्रसंगी डॉ.डी.टी.गायकवाड लिखित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जल संसाधनावरील बीजभाषणे व 
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू संत कबीर या दोन पुस्तकांचे प्रकाशन डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सुनिता रोकडे,प्रकाश गायकवाड, लालन शिंदे, विमल गायकवाड, डॉ.प्रिया गायकवाड, राजेश राजगुरू,स्वाती गायकवाड,भारती मोरे आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष सोनवणे यांनी केले तर सुत्रसंचलन सरला उपरवट यांनी केले व आभार हर्षनंद सोनवणे यांनी मानले . या वेळी डॉ.राजाभाऊ भैलुमे, दिलीप सरोदे, सुप्रिया कासारे,मनोज गजभार,प्राची साळवे, किशोर ढमाले, धनंजय लोखंडे, एस.के. गायकवाड, चंद्रकांत शिंदे आदीसह कार्यकर्ते  उपस्थित होते.
 
Top