विद्यार्थीनी आवडीच्या क्षेत्रात ध्येय निश्चित करून योग्य परिश्रम केल्यास यश नक्कीच मिळते - जि. प. माजी सदस्य प्रकाश चव्हाण
नळदुर्ग,दि.२८:
विद्यार्थीनी आवडीच्या क्षेत्रात ध्येय निश्चित करून योग्य ते परिश्रम केल्यास यश नक्कीच मिळते असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांनी जळकोट ता.तुळजापूर येथील कुलस्वामिनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी बोलताना सांगितले.
.प्रथमता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.मोतीराम चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, शाळेनी आपल्याला व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे म्हणाले.यावेळी गजेंद्र कदम,आशिष सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, सोसायटीचे माजी चेअरमन राजकुमार पाटील, संस्थेच्या अध्यक्षा चंचलादेवी चव्हाण, माजी सरपंच ज्योतिका चव्हाण, सुभाष नाईक, उपस्थित होते.
प्राचार्य संतोष चव्हाण, तांडा सुधार समितीच्या अशासकीय सदस्या राणी राठोड,पिन्टू राठोड, रंजीता पवार, मुख्याध्यापक विनायक राठोड , नागेंद्र गुरव, सुरेश कोकाटे, प्रमिला कुंचगे, शांताबाई चौगुले ,मयुरी कांबळे, साबळे कदम,किरण ढोले, बालाजी राठोड, अमित खारे, शंकर चव्हाण यांच्या सह शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन किरण कांबळे यांनी केले तर आभार बाळासाहेब मुकम यांनी मानले.