मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा-  प्रा. डॉ. महेश मोटे                   

 मुरूम, ता. उमरगा, दि. २९ :

 मराठी भाषेचा प्रसार व तिच्या सांस्कृतिक महत्त्वाची जाणीव युवा पिढीला करून देण्याच्या हेतूने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा सुरू आहे. युवा पिढीला भाषेचे महत्त्व, अभिमान बाळगणे, साहित्य, कला, संगीत व संस्कृतीचा प्रचार करणे. मराठी भाषेतील लेखन, वाचन, संवाद व शुद्धलेखन कौशल्य विकसित करणे. यासाठी कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा. यासाठी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले.                   


श्री माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित मराठी पदवी-पदव्युत्तर विभाग यांच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारोप प्रसंगी मंगळवारी (ता. २८) रोजी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी प्रा. डॉ. महेश मोटे, भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरसिंग कदम उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपप्रसंगी चंद्रकांत बिराजदार म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात  प्रादेशिक भाषेतून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे, यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आवडीनिवडीनुसार विषयाची स्वायत्तता दिली आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ व्यवहारे तर आभार प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.                          

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित व्याख्यानाप्रसंगी डॉ. महेश मोटे, डॉ. चंद्रकांत बिराजदार, नरसिंग कदम व अन्य.
 
Top