अमृता फडणवीस यांच्या बंजारा गीतांवर अर्चनाताई पाटील यांनी केला महिला समवेत नृत्य; श्री सेवालाल महाराज जयंती नळदुर्ग शहरात जल्लोषात साजरी

नळदुर्ग,दि.१५: शिवाजी नाईक 

  "सेवालाल महाराज की जय " च्या जय घोषात श्री सेवालाल महाराज यांची जयंती मोठया जल्लोषात नळदुर्ग येथे साजरी करण्यात आली. अमृता देवेद्र फडणवीस यांनी गायलेल्या बंजारा गीतावर पारंपारिक वेशभुषेत बालीकांनी नृत्य् सादर केले.  तर याच गीतावर जि.प.माजी अध्यक्षा सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी महिला समवेत बंजारा वेशभुषा पारिधान करून उत्साहात नृत्य् सादर केले.
नळदुर्ग येथील कै.वसंतराव नाईक (गोलाई) चौकात शनिवार रोजी सकाळी ११ वाजता सदगुरू श्री.सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भोगचा कार्यक्रम होऊन ध्वजारोहन करण्यात आले. अक्कलकोट रोड येथुन रॅली काढण्यात आली शहरातील मुख्य् रस्ता, हुतात्मा चौक, ऐतिहासीक किल्ला गेट, बाजार पेठ, चावडी चौक, बसस्थानक समोर, रॅलीची समोरोप करण्यात आले. या रॅलीत महिला युवक पुरूष पारंपारिक वेशभुषेत मोठया प्रमाणावर सहभागी झाले रॅली दरम्यान सहाय्य्क पोलिस निरिक्षक कांगुने यांनी प्रतिमेचे पुजन केले. त्यानंतर महाप्रसादाचे उपस्थितांना वाटप करण्यात आले.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य असलेले श्री.उमाकांत मिटकर, जि.प. माजी अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील,
 अशासकीय जिल्हा सदस्य संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेचे विलास राठोड, प्रवीण पवार, वसंत, पवार ,दामाजी राठोड. निवृत्त नायब तहसिलदार माणिक चव्हाण, माजी जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अँड दीपक  आलुरे,  कॉग्रेस कमिटी तुळजापूर तालुकाध्यक्ष तथा संरपच रामचंद्र आलुरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशिष सोनटक्के,भाजपचे नळदुर्ग  शहराध्यक्ष धिमाजी घुगे, नगराध्यक्षा झिमाबाई राठोड, माजी नगरसेविका छमाबाई राठोड, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड, उपसरपंच अमृता चव्हाण, हारिश जाधव, वैभव जाधव, विशाल जाधव, कैलास चव्हाण, लक्ष्मण राठोड, रोहित राठोड, सुशिल राठोड,विश्वास रणे, अबुल हसन रजवी आदीसह बंजारा समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  जयंती महोत्सव समितीचे प्रमुख रवी  महाराज राठोड,  पत्रकार शिवाजी नाईक ,महेश चव्हाण,  अकाश जाधव  बालाजी राठोड ,  सचिन राठोड , दत्ता राठोड,  प्रभाकर जाधव,दिलीप  राठोड, प्रवीण चव्हाण आदीनी पुढाकार घेतले.
 
Top