नळदुर्ग,दि.०५: नवल नाईक
नळदुर्ग शहरात प्रतिवर्षाप्रमाणे दि. १५ फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या श्री संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते रवी महाराज राठोड यांची निवड करण्यात आली आहे. जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नळदुर्ग शहरातील अंबाबाई मंदिर येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्याबाबत शहर व परिसरातील गावच्या बंजारा समाज बांधवाची बैठक निवृत्त तहसिलदार माणिकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होवुन यावर्षीच्या नुतन कार्यकारणीची निवड सर्वानुमते पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.
अध्यक्षपदी रवि राठोड महाराज, उपाध्यक्ष- महेश चव्हाण, आकाश जाधव , सचिव- बालाजी राठोड , सहसचिव- सचिन राठोड , कोषाध्यक्ष- दत्ता राठोड, सहकोषाध्यक्ष-प्रभाकर जाधव, मिरवणूक प्रमुख- कैलास चव्हाण ,सचिन पवार, दिलीप राठोड, प्रवीण चव्हाण, कार्याध्यक्ष: नामदेव पवार , प्रसिध्दी प्रमुख पत्रकार शिवाजी नाईक आदींची निवड करण्यात आली आहे.
यावेळी श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यबाबत व सांस्कृतिक कार्यक्रमासह प्रबोधनात्मक विविध कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी विलास राठोड, प्रवीण पवार , वसंत पवार, दामाजी राठोड,माजी नगरसेवक निरंजन राठोड, छमाबाई राठोड, हारिश जाधव, कैलास चव्हाण,वैभव जाधव, निवृत्त नायब तहसीलदार माणिक पवार, सुरेश राठोड, संजय जाधव, दत्ता राठोड, सुशिल राठोड, लक्ष्मण राठोड, बाळु पवार,तेजस राठोड, सौरभ राठोड, सुरेश चव्हाण, लखन राठोड , प्रभाकर राठोड, किरण राठोड, अवकाश जाधव, राहुल जाधव, आदी प्रमुख मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते.