राज्यस्तरीय  पुरस्काराने  पत्रकार आयुब शेख यांचा गौरव 


नळदुर्ग,दि.०६

  नळदुर्ग येथिल आपलं घर प्रकल्प याठिकाणी पत्रकार आयुब शेख यांना  राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार जेष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांच्या हास्ते   प्रदान करण्यात आले. शेख यांच्या उल्लेखनीय  कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आले असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पन्नालाल  सुराणा  हे होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष  बाबासाहेब वडवे,  रामचंद्र ढवळे,  मारुती बनसोडे  उपस्थित होते. 

प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. सुरेश वाघमारे,डॉ. मिलिद वाकोडे   मैना (तृप्ती) भोसले / वडणे, दत्तात्रय लांडगे  प्रा. राजा सोनकांबळे,  आदीसह अनेक प्रतिष्ठ नागरिक  उपस्थित होते.
 
Top