ह.भ.प.सुरेशसिंग परिहार महाराज यांना देवज्ञा

वागदरी ,दि.०७

वागदरी ता. तुळजापूर येथील ग्रामदैवत संत श्रेष्ठ सद्गुरु भवानसिंग महाराज देवस्थानचे मुख्य पुजारी तथा भवानसिंग महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुरेशसिंग उमरावसिंग परिहार महाराज यांचे 
दि.6 फेब्रुवारी 2025 रोजी अल्पशा अजाराने  निधन झाले.

  ह.भ.प सुरेशसिंग परिहार महाराज हे शांत, संयमी, अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे ज्येष्ठ वारकरी होते.त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गावातील सर्व सामाजिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. दि 6/ 2 /2025 रोजी सायंकाळी ठीक 6:00 वाजता वागदरी येथील स्मशानभूमी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले .याप्रसंगी उपस्थित शोकाकुल जनसमुदायानी त्याना भावपूर्ण श्रध्दांजली वाहीली.
  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना जावाई नाथ जावाई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
 
Top