महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार - अर्चनाताई पाटील यांची ग्वाही

अणदूर,दि.०८:  चंद्रकांत हगलगुंडे

महिला सक्षम झाल्या तरच कुटुंब व समाज प्रगतीपथावर जाईल त्यासाठी महिलांनी विविध क्षेत्रात पुढाकार घेऊन स्वतःबरोबर कुटुंबाचा व समाजाचा विकास साधण्याचे आवाहन करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही धाराशिव लेडीज क्लबचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी दिले.

अणदूर येथील आंबेडकर नगर येथे मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर महिला मंडळ अंतर्गत माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य  साधून हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिताताई कांबळे उपस्थित होत्या.

यावेळी रमाई महिला मंडळाचे अध्यक्षा लक्ष्मी  गायकवाड व लक्ष्मी सूर्यवंशी यांचा सत्कार अर्चनाताई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लक्ष्मी गायकवाड यांनी चिवरी पाटी रमाई नगर रस्ता स्वच्छ, लाईटची व्यवस्था, संविधान सभागृह बांधण्याची, महिलांना उद्योग उभारण्यासाठी मदत करण्याची मागणी केली. 

यावेळी रेणुका लिंबुळे, शैला पाटील, शीला जेटीथोर, रेशमा कांबळे, सुजाता चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रेशमा कांबळे, इंदुताई सूर्यवंशी, लक्ष्मी सूर्यवंशी, भामाबाई कांबळे, भाग्यश्री चंदनशिवे, शैला मुक रे, सुनिता गवळी, रंजना मुकरे, चंदा कांबळे, ललिता दुपारगुडे, शोभा गायकवाड, सरिता मस्के, जयश्री कांबळे, सुजाता सुरवसे सह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका लिंबोळे, प्रास्ताविक राजकुमार गायकवाड तर आभार सुजाता चव्हाण यांनी मानले.
 
Top