नळदुर्ग : मल्लिकार्जुन मंदिर सभागृहात बुधवार दि.१९ फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर
नळदुर्ग,दि.१६ :
राजमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज व युग पुरुष श्री स्वामी विवेकानंद (युवक दिन ) यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही जयहिंद प्रतिष्ठानच्या वतीने नळदुर्ग शहरातील मल्लिकार्जुन मंदिर सभागृहात बुधवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
भव्य रक्तदान शिबीराचे हे ८ वे वर्ष आहे. राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमात अमुल्य असे रक्तदान करुन या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक जयहिंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय बताले यांनी केले आहे.