दिल्ली येथील राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी जवाहरच्या निखिल चव्हाणची निवड
अणदुर,दि.१६: चंद्रकांत हागलगुंडे
जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक निखिल चव्हाण बीएससी द्वितीय वर्ष याचे 21 मार्च 2025 ते 27 मार्च 2025 या कालावधीत दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी निवड झालेला आहे. व तसेच 17 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 या कालावधीत अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे प्रेरणा राज्यस्तरीय नेतृत्व गुणविकास शिबिरासाठी हरिओम कोरे बीएससी प्रथम वर्ष याची निवड झालेली आहे .
संस्थेचे सचिव, रामचंद्र आलुरे ॲड. लक्ष्मीकांत पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे कार्यक्रम अधिकारी डॉ. सूर्यकांत आगलावे डॉ. दयानंद कांबळे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.