वागदरी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध ठिकाणी आभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

वागदरी,दि.१५:

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे विविध ठिकाणी आभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  येथील भिमनगर मध्ये  पंचशील बुध्द विहार समाज मंदिराच्या प्रागणात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वातीने आभिवादन व ध्वजा रोहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी सरपंच सौ. तेजाबा शिवाजी मिटकर, उपसरपंच सुरेखाताई भालचंद्र यादव,पोलीस पाटील बाबुराव  बिराजदार,जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी भाजपा मेडिया सेलचे तालूका अध्यक्ष किशोर धुमाळ आदी मान्यवरांच्या हस्ते तर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष नागनाथ बनसोडे, उपाध्यक्ष मोहन वाघमारे, सचिव आंबादास झेंडारे,खजीनदार दत्तू वाघमारे, अनिल वाघमारे, उत्तम झेंडारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत तथागत भगवान गौतम बुध्द व महमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून संरपंच तेजाबाई मिटकर यांच्या हस्ते  ध्वजारोहन करून सामुदायिक रित्या बुद्ध वंदना घेऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना आभिवादन करण्यात आले. 


या प्रसंगी शालेय विद्यार्थांची भाषणे झाली. यावेळी लक्ष्मण झेंडारे व त्यांच्या सुविद्य पत्नी कोमलं झेंडारे यानी दिवंगत मातोश्री शकुंतलाबाई उत्तम झेंडारे यांच्या स्मरणार्थ येथीलं बि. आर. लेझिम संघास एक डजन लेझिम भेट दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन रिपाइं (आठवले ) चे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड यानी केले. या वेळी संदिपान वाघमारे,  महादेव वाघमारे, सुर्यकांत वाघमारे, सहादेव वाघमारे, भारत वाघमारे, दिपक वाममारे, शिवाजी वाघमारे, बाबासाहेब वाघमारे, नामदेव वाघमारे,वाल्मिक वाघमारे, कविता गायकवाड, प्रमिला वाघमारे, श्रीदेवी वाघमारे, ठकुबाई वाघमारे, उज्वला वाघमारे, गीताबाई झेंडारे, मुक्ताबाई वाघमारे, शंकर भंडारे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  येथिल ग्रा. प. कार्यालयात ही डों. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सरपंच तेजाबाई मिटकर,उपसरपंच सुरेखाबाई यादव, मिनाक्षी बिराजदार,ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर पाटील रोगगार सेवक रामरिंग परिहार यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिचे पूजन करून आभिवादन करण्यात आले. तर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर १३४ व्या जयंती निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जते यांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शालेय व्यवस्थापन समितचे अध्यक्ष  महादेव वाघमारे,उपाध्यक्ष कोमल झेंडारे,जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी, यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आभिवादन करण्यात आले या वेळी शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. या प्रसंगी  एस. के. गायकवाड  व माजी उपसरपंच दत्ता सुरवसे यांची ही शुभेच्छापर भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सहशिक्षक तानाजी लोहार यानी केले तर अभार  शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते यानी केले.या वेळी सरपंच तेजाबाई मिटकर, उपसरपंच सुरेखाबाई यादव,ज्ञानेश्व बिराजदार,विश्वनाथ पाटील,जयंती उत्सव कमिटी चे नागनाथ बनसो, मोहन वाघम,दत्तू वाघमारे
 सह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top