आलियाबाद ग्रामपंचायत कार्यालयात घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
जळकोट,दि.१४:
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे ग्रामपंचायत कार्यालयात घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण,माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, सेवा निवृत्त विस्तार अधिकारी डॉ यशवंत चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, शिवाजी पोलीस पाटील,हरीदास राठोड, शिवाजी चव्हाण, मोतीराम राठोड, संतोष राठोड, संजय राठोड, सुभाष चव्हाण, संदीप राठोड,बाबु जाधव , मनोज पवार यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.