डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर ; रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद       

                                     
मुरूम, ता. उमरगा, दि १६  : 

भीम नगर, मुरूम,  ता. उमरगा येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात रोटरी क्लब मुरूम सिटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी (ता. १६) रोजी घेण्यात आले. 

धाराशिव येथील जे. एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालयाचे नेत्र तज्ञ डॉ. शिवरुद्र इसाके, डॉ. सागर शिंदे, उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे दंत चिकित्सक डॉ. शिवाजी मेनकुदळे, शल्यचिकित्सक डॉ. प्रभाकर बिचकाटे, कान नाक घसा तज्ञ डॉ. विजय जाधव, अक्षय भालेराव आदींनी रुग्णांची योग्यती तपासणी करून औषधोपचार केला. यावेळी रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, सचिव सुनिल राठोड, डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. महेश स्वामी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक एम. एन. अर्दाले, वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एल. कांबळे, रवि भालेराव, संतोष थोरात, सुजित जाधव, विजयकुमार भोसले, रवि लोहार आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

जयंती समितीचे संयोजक तथा अध्यक्ष प्रा. महेश कांबळे, उपाध्यक्ष आशिष नाईकवाडे, कोषाध्यक्ष संतोष कांबळे, सचिव प्रशांत गायकवाड, सहसचिव गौतम गायकवाड आदींनी पुढाकार घेतला. जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक समतेचा संदेश कृतीत उतरण्याचा हा प्रयत्न असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. या शिबिरात २०० पेक्षा अधिक रुग्णांमध्ये जेष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची काळजीपूर्वक तपासणी करण्यात आली. काही गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी विनामूल्य चष्मे आणि शस्त्रक्रियेची शिफारस करण्यात आली. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील भीम नगरातील सार्वजनिक वाचनालयात आयोजित शिबिराप्रसंगी डॉक्टर रुग्णांची तपासणी करताना
 
Top