नळदुर्गचा अमर बंडगर राज्यस्तरीय अबकॅस स्पर्धेत राज्यातुन व्दितीय; रवी महाराज राठोड यांच्या हस्ते गौरव
नळदुर्ग,दि.१६:
नळदुर्ग शहरातील दुर्गानगर येथिल अमर गोविंद बंडगर या विद्यार्थ्यांने नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच पार पडलेल्या राज्यस्तरीय अबकॅस स्पर्धेत राज्यातुन व्दितीय क्रमांक पटकावल्याबद्दल रवी महाराज राठोड यांच्या वतीने गौरव करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अमर बंडगर हा विद्यार्थी सध्या हुतात्मा बाबुराव बोरगांवकर माध्यमिक शाळ श्री तुळजाभवानी साखर कारखाना साईट (नळदुर्ग) याठिकाणी शिक्षण घेत आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करुन अभिनंदन केले जात आहे.
दुर्गानगर याठिकाणी रवि महाराज राठोड यांनी अमर बंडगरचा फेटा बांधून शाल, पुष्पहार घालुन व पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवुन सत्कार केला. याप्रसंगी दिलीप राठोड, गणेश राठोड , लक्ष्मण चव्हाण, बाबू राठोड, सूर्यकांत चव्हाण, रमेश पाटील, तेजेश राठोड, किरण राठोड, सुनील सोमवसे, बालाजी बंडगर , तुकाराम ईटकर, किरण धोत्रे, योगेश पवार, सागर पवार, गणेश बंडगर, खंडु माने, अडवप्पा पवार ,ईराप्पा पवार, अनिल पवार, विठ्ठल बंडगर, सिद्राम देवकर, शंकर दुर्लेकर शिवाजी सोमवसे, तिम्मा सोमवसे, बिरु कोळी, गिडप्पा बंडगर, दुर्गाप्पा पवार, हणमंत बंडगर आदी उपस्थित होते.