शहापूर शाळेत विविध कार्यक्रमांने प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा

नळदुर्ग,दि.१६ :

सोमवार दि. १६ जुन रोजी शाळेचा शैक्षणिक वर्षाचा पहिल्या दिवशी शहापूर ता.तुळजापूर येथिल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम   उत्साहात पार पडला.       

शहापूर गावातुन सकाळी  10  वाजता प्रवेश दिंडी काढण्यात आली.  इयत्ता 5 वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024-2025 मध्ये पात्र ठरलेल्या 5 विद्यार्थ्यांची व पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवागत बालकांना सुशोभित करण्यात आलेल्या बैलगाडीतुन  हालगीच्या कडकडाटात व बँजोच्या निनादात पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. तदनंतर शाळेच्या भव्य प्रांगणात  कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर सरपंच उमेश गोरे, उपसरपंच- नानासाहेब पाटील,शालेय सामितीचे अध्यक्ष  गणपतराव शिदे . उपाध्यक्ष- स्मीता चव्हाण, , पोलीस पाटील- खरात आदीसह पालक आणि मान्यवरांच्या  उपस्थितीत इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवागत बालकांचे पुष्पगुच्छ देऊन  स्वागत करण्यात आले. तसेच इ.5 वी  पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या  एकूण 05 विद्यार्थ्यांचे फेटा बांधून पुष्पहार पुष्पगुच्छ देवून   सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
      
प्रवेशोत्सव क्र.2 दालनाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शासनाच्या विविध योजना बाबत व चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमाबाबत, गुणवत्ता  वाढविण्यासाठी शालेय नियोजनाबाबत मुख्याध्यापक विक्रम मगतराव   यांनी माहिती दिली.यावेळी इयत्ता 1 ली ते 7 वी विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकाचे वितरण  करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून पुढील वाटचालीस व शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश कोळी यांनी तर आभार एकनाथ शिरगुरे  यांनी मानले. शेवटी मान्यवरांच्या उपस्थितीत मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले. प्रवेशोत्सव  कार्यक्रम  उत्सात संपन्न झाला.






 
Top