अल्पसंख्याकावरील  अन्याय अत्याचाराच्या विरोधात   नळदुर्ग येथिल अपर तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन ;  तहसीलदार प्रमोद गायकवाड यांना दिले 
विविध मागण्यांचे निवेदन  

नळदुर्ग,दि. २६ : 

व्यापारी, शेतकरी, शेतमजूर अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात नळदुर्ग येथे कुरेशी समाजाच्या वतीने नळदुर्ग अपर तहसील कार्यालय समोर  दि.२५ जुलै  शुक्रवार रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. कायदेशीर संरक्षण अमलबजावणी, बेकादेशीर गोरक्षण केंद्र बंद करुन कारवाई करावी, कोंडवाडा सेवा सुरू करावी, शासकीय कत्तलखाना निर्मिती स्थानिक पातळीवर करणे, वाहतूक परवान्याचे ऑनलाईन वितरण, महामंडळ स्थापन करणे, आदीसह विविध मागण्याचे निवेदन यावेळी नळदुर्ग 
अपर तहसीलदार प्रमोद गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शासनाकडून मुद्दाम अल्पसंख्याक, दलित समाजास लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत शेतकरी, व्यापारी यांच्या विरोधात शासन काम करत आहे. त्या वर्गात आम्ही संघटितपणे लोकशाही मार्गाने लढा उभारू असा निर्धार उपस्थितांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केला. 

निवेदनात म्हटले आहे की,  गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला तेव्हापासूनच शेतकऱ्याच्या भाकड जनावराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या जनावराची जी मोठी खरेदी विक्रीचा व्यवसाय होतो. त्यामध्ये कुरेशी व व्यापारी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांच्याकडे खरेदी विक्रीचे परवाने सुद्धा आहेत. ही भाकड जनावरे  कत्तलीसाठी वापरले जात नसल्याचे  नमुद करुन द्वेष भावनेतून कुरेशी व व्यापाऱ्यांना विशेष लक्ष केले जात असल्याचे आरोप करुन अनेक ठिकाणी हत्या 
झाल्याचे म्हटले आहे. या अन्यायच्या विरुद्ध कुरेशी व व्यापारी समाजानेही भाकड जनावरे खरेदी विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज शेतकऱ्याच्या भाकड जनावराचा मोठा प्रश्न निर्माण होऊन सर्व व्यवहार ठप्प आहेत. हा अन्याय सुरूच राहिला व मागण्या पूर्ण झाले नाही तर  खरेदी विक्री व्यवहार करणार नाही. असे सांगितले आहे.



यावेळी माजी नगराध्यक्ष  मुस्ताक कुरेशी, लहुजी शक्ती सेनेचे  शिवाजी गायकवाड, माजी नगरसेवक शहबाज काझी, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अरूण लोखंडे, आमेर शेख, लखन गुंडवे,  बाबासाहेब बनसोडे, मौलाना महंमद रजासाहब, राजेंद्र शिंदे , मुस्ताक कुरेशी, गफुर कुरेशी, बरकत कुरेशी, इकबाल कुरेशी, शाहेद कुरेशी, बकर कुरेशी, हाजी म. युसुफ कुरेशी, वसीम कुरेशी, अजझर जहागीरदार, आबेदीन कुरेशी, हसन कुरेशी, हुसेन कुरेशी, यांच्यासह हिंदू, मुस्लिम व दलित समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top