नळदुर्ग,दि.२६ :विलास येडगे
नळदुर्ग येथील शिवशाही तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी शाम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
नळदुर्ग शहरातील शिवशाही तरुण गणेश मंडळ हे सर्वात जुने मंडळ असुन या मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपुर्व काळात म्हणजे 1943 साली झाली आहे. गेल्या 82 वर्षांपासुन शिवशाही तरुण गणेश मंडळ गणेशोत्सव साजरा करीत आहे. यावर्षीही मोठ्या धुमधडाक्यात मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मंडळाची नविन कार्यकारीणी निवडण्यासाठी दि. 25 जुलै रोजी मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत मंडळाची नविन कार्यकारीणी निवडण्यात आली ती पुढीलप्रमाणे.
अध्यक्ष शाम शिंदे, उपाध्यक्ष:- शिवाजी सुरवसे, नवनाथ पवार, सचिव:--नितीन शिंदे, सहसचिव:-- नितीन जाधव, कोषध्यक्ष:--संतोष मुळे, सहकोषध्यक्ष:-- युवराज जगताप, सांस्कृतिक प्रमुख:-- प्रमोद जाधव, कुलवंत मुळे, श्रीकांत सावंत, मिरवणुक प्रमुख:-- सुरेश हजारे, तानाजी मुळे, पांडुरंग गायकवाड, सुहास येडगे, तानाजी जाधव, कुरुक्षेत्र किल्लेदार, व्यवस्थापक:-- ज्ञानेश्वर जाधव, महादेव जगताप व अमित येडगे ईत्यादि. नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.