सोलापूरची स्वाती राठोड सहाय्यक जिल्हाधिकारी! : केरळमध्ये मिळाली पोस्टिंग
सोलापूर ,दि.२६:
आय ए एस झालेल्या स्वाती राठोड या सोलापूरच्या तरुणीने आज केरळमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी (Assistant Collector) म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. स्वाती यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यश नाही, तर तो संघर्ष, जिद्द आणि समाजातील बंधने तोडणाऱ्या धैर्यशीलतेचा प्रतीक आहे.
बंजारा समाजाच्या पारंपरिक वाटेवरून शासनाच्या निर्णय केंद्रापर्यंत पोहोचणाऱ्या या प्रवासाने दाखवून दिलं की स्वप्नं मोठी असली की मार्ग आपोआप निर्माण होतो. आज स्वाती राठोड हे नाव शेकडो तरुणींना आणि उपेक्षित घटकांतील विद्यार्थ्यांना आशेचा किरण वाटतो आहे.