नळदुर्ग एस.टी. बसस्थानकात २४ तास वहातुक नियत्रंकाची सेवा उपलब्ध करावी : भाजपा सोशल मिडीया सेल सह प्रवासी जनतेची मागणी

वागदरी,दि.३० : किशोर धुमाळ

धाराशिव जिल्ह्यातील परिवहन महामंडळच्या तुळजापूर आगार अंतर्गत येणाऱ्या नळदुर्ग बसस्थानकात २४ वाहातूक नियंत्रक सेवा उपलब्ध करावी अशी मागणी भाजपा सोशल मिडीया सेलचे तुळजापूर तालूका अध्यक्ष  किशोर धुमाळसह प्रवाशी जनतेतून होत आहे.


  या संदर्भात विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय धाराशिव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हे मुंबई ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर वसलेले ऐतिहासिक शहर असून जवळपास ६५ गावांच्या केंद्रस्थानी आहे. देशभरात कोठेही जायचे असेलतर नळदुर्ग बस स्थानकावरच यावे लागते. त्यामुळे या बस स्थानकावर प्रवासांची नेहमी वर्दळ असते. रात्रीच्याही वेळी या बसस्थानकावरून लांब पल्याच्या पंधरा ते वीस बसेस ये जा करतात. त्यामुळे या ठिकाणी चोवीस तास वाहातुक नियंत्रकाची गरज आहे. तसेच या ठिकाणी अगाऊ आरक्षणाची सोय नसल्याने प्रवासाना अगाऊ आरक्षणासाठी उमरगा किंवा तुळजापूरला जावे लागते. त्यामुळे सामान्य प्रवाशाना नाहकच अर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.तरी या बस स्थानकावर अगाऊ अरक्षणाची सोय करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

 निवेदनावर भाजपा कार्यकर्ते व किसान मोर्चा अध्यक्ष अंगद जाधव, सरचिटणीस कल्याण बिराजदार, सुनील सुर्यवंशी यासह इतरांच्या  सह्या असून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलेले शिफारस पत्र ही जोडण्यात आले आहे.

सदर मागणीचे निवेदन संबधित परिवहन मंत्री तथा पालकमंत्री ना. प्रताप सरनाईक यांनाही पाठविण्यात आले आहे.
 
Top