महायुती सरकार बहिणींना २१०० रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीही देणारच

ना चंद्रशेखर बावनकुळे  यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

धाराशिव,दि.०८


 विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण जनतेला संकल्पनामाच्या माध्यमातून पाच वचन दिले होते. त्यावर काम सुरू असून लाडक्या बहिणींना २१०० रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच आहोत, अशी ग्वाही महसूल मंत्री  बावनकुळे यांनी धाराशिव येथे कार्यकर्त्यांना दिली. 

 महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे  यांनी धाराशिव येथिल प्रतिष्ठान भवन, भाजप कार्यालय प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेवून त्यांच्याशी संवाद साधला.  


येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपणास एकही सीट पडू द्यायची नाही. नेत्यांच्या निवडणुकांसाठी तुम्ही रक्ताचे पाणी केले. आता वेळ आमची तुमच्यासाठी कष्ट करण्याची आहे. राज्य व केंद्रातील मंत्र्यापासून पदाधिकाऱ्यापर्यंत सर्वजण तुमच्यासाठी जीवाचे रान करतील, तुम्ही मात्र गाफील राहू नका, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

संकल्पनाम्यानुसार आपल्या सरकारने शेतकऱ्यांना २०२९ पर्यंत मोफत वीज देण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना दाखल्यासाठी लागणारे ५०० रुपयांचे बाँड बंद करून टाकले आहेत. शेतरस्त्यांचा वादा केला होता तो पूर्णत्वास नेत आहोत, त्याचे कामे सुरू झाले आहे. लाडक्या बहिणींना वचनानुसार १५०० रुपये तर दिलेच २१०० रुपये देण्याचे वचनही आपण पूर्ण करणार आहोत. कर्जमाफीची आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के आपण कर्जमाफी देणार आहोतच. त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी न करता पूर्ण ताकतीने तयारीला लागा, असे आवाहन  बावनकुळे  यांनी कार्यकर्त्यांना केले. 
यावेळी उपस्थित लाडक्या बहिणींकडून  बावनकुळे यांना राखी बांधण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार  सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार  राजेंद्र राऊत, संघटन मंत्री  संजय कौडगे, . किरण पाटील, जिल्हाध्यक्ष  दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष  नितीन काळे,  संताजी चालुक्य,   मिलिंद पाटील,  व्यंकट गुंड,  सुनील चव्हाण,  रामदास कोळगे,  खंडेराव चौरे,  राजसिंह राजेनिंबाळकर,  नितीन भोसले यांच्यासह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top