आमदार राणाजगजितसिंह पाटील लवकरच मंत्री होतील - महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून कौतुक; ऐतिहासिक निधी आणल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा नागरी सत्कार

तुळजापूर ,दि.०८ :

 आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे काम दूरदृष्टी विकासासाठी असून आई तुळजाभवानीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगेल की, राणाजगजितसिंह पाटील यांना मंत्री करा, आणि ते नक्कीच मंत्री होतील असा ठाम विश्वास व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार पाटील मंत्री पदाबाबत सुतोवाच केले.

राज्य विधीमंडळातील कर्तव्यदक्ष व ध्येयवादी व्यक्तीमत्व आमदार राणा पाटील यांचे आहे. तुळजाभवानीची सेवा करण्याची संधी तुम्ही त्यांना दिली. कर्तव्यभावनेतुन ते पुर्ण करत असल्याची प्रशंसा महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुळजापुरातील नागरी सत्कार प्रसंगी केली.

तुळजापूर येथील भवानीकुंड पार्किंग स्थळी आ. राणा पाटील यांचा गुरूवारी (दि.७) महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जि.प.च्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील, माजी आमदार राजाभाऊ राऊत. महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, कार्यक्रमाचे आयोजक विनोद गंगणे, जि.प.चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, विद्यमान अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अनिल काळे, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, तुळजाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनिल चव्हाण, मजूर फेडरेशनचे नारायण नन्नवरे, संतोष बोबडे, आनंद कंदले, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, शांताराम पेंदे, सुनिता रोचकरी, नरेश अमृतराव, सज्जन साळुंके, विजय गंगणे, स्वागताध्यक्ष बाळासाहेब
शिंदे, बाळासाहेब शामराज आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

नागरी सत्कार कार्यक्रमात पुढे बोलताना महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महाराष्ट्राची कुलस्वामीनी जगदंबा ही महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहे. चौदा कोटी जनतेच्यावतीने मी तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होतो. आ. पाटील या ठिकाणी जे काम करत आहेत त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेवून मंत्रीमंडळ बैठकीत एक हजार ८६५ कोटीच्या तुळजाभवानी मंदिर व शहरासाठीच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्या घटनेचा मी साक्षीदार आहे. अभिमान आहे की, राणा पाटील यांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली. आ. राणा पाटील यांना आई श्री तुळजाभवानी माताचं मंत्रीपदी बसवेल. महायुती सरकारने ४५ हजार शेतकऱ्यांचे वीजबील माफ केले. धाराशिव जिल्हा लवकरच बेकारी मुक्त होईल. तुळजापूरचा आमदार होणे यासाठी भाग्यच लाभते. ते राणा पाटील यांना मिळाले आहे.

प्रस्ताविक आनंद कंदले यांनी केले तर सत्काराला उत्तर देताना आ. राणा पाटील यांनी विवकास कामासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप गंगणे, सुहास साळूंखे,शिवाजी बोधले,औदुंबर कदम, अविनाश गंगणे, धैर्यशील दरेकर, नितीन रोचकरी, उमेश गवते यांनी परिश्रम घेतले.
 
Top