यंदाच्या गणेशोत्सवात आदर्श ठरणा-या गणेश मंडळास रोख रक्कमेचे आकर्षक पारितोषिक; 

सकल समाजाच्यावतीने आयोजित बैठकीत जाहीर 
नळदुर्ग,दि.०८ : 

नळदुर्ग शहारात यावर्षीच्या गणेशोत्सवात  "श्री"  च्या विसर्जन मिरवणुकीत वादविवाद  न करता,शांततेत  व्यसनमुक्त वातावरणात उत्साहात मिरवणूक काढून आदर्श ठरणा-या गणेश  मंडळाला रोख ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्याचे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक बंडोपंत पुदाले यांनी आयोजित बैठकीत जाहीर केले आहे.

 नळदुर्ग शहरातील गणेश उत्सव साजरा करण्याबाबत व विसर्जन मिरवणूकीचे नियोजनाकरिता सकल हिंदू समाजाचे गणेश मोरडे, विजय ठाकूर, रोहित डुकरे, अमर डुकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अंबाबाई देवस्थान येथे आयोजित केली होती.

 गणेशोत्सव नळदुर्ग शहरांमध्ये शांततेत व व्यसनमुक्त गणेश उत्सव साजरा करुन एक आदर्श निर्माण करण्याचा निर्धार करून  विसर्जन मिरवणूकीबाबत योग्य नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अनेकांनी मार्गदर्शन केले. 

याबैठकीस भाजपचे नेते सुशांत भूमकर , शहराध्यक्ष बसवराज धरणे, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे,
माजी नगरसेवक दत्तात्रय कोरे, विनायक, अहंकारी ,बंडोपंत पुदाले, सुनील उकंडे ,विलास येडगे, अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव यांच्यासह सकल हिंदू समाजाचे गणेश मोरडे, विजय ठाकूर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. 
याप्रसंगी सकल समाजाच्यावतीने उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आला.
या बैठकीस धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ, शिवशाही तरुण गणेश मंडळ, भोईराज गणेश मंडळ, जय भवानी तरुण गणेश मंडळ, नवचैतन्य तरुण गणेश मंडळ, न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळ, माऊली तरुण गणेश मंडळ, महाराणा प्रताप तरुण गणेश मंडळ, जय हनुमान तरुण गणेश मंडळ, जय हिंद तरुण गणेश मंडळ व्यासनगर, भवानीनगर गणेश मंडळ, रोकडे हनुमान गणेश मंडळ ,जवाहर तरुण गणेश मंडळ, व्यापारी गणेश मंडळासह  शहरातील प्रमुख गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
प्रास्ताविक विनायक अहंकारी, तर आभार संजय बताले यांनी मानले.
 
Top