आता नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून "जनता दरबार" होणार जिल्हा अधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन
धाराशिव,दि.०५ :
धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरिकांच्या शासकीय कामकाजाबाबत अडचणी व तक्रारी सोडवण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून "जनता दरबार" हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार आहे.
सदर उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिक हे जिल्हाधिकारी कार्यालयात आठवड्यातील सोमवार बुधवार व शुक्रवार रोजी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशीव येथे उपस्थित राहून जिल्हाधिकारी यांच्या समक्ष अडचणी व तक्रारीच्या अनुषंगाने संवाद साधू शकतात तसेच अर्ज देऊ शकता. तरी धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिक यांनी" जनता दरबार" या उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे शासकीय कामकाजाबाबत अडचणी व तक्रारी सोडवण्यासाठी उपस्थित राहण्याच आवहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.