मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भाजप कार्यकर्त्यांकडुन धनादेश सुपूर्द
नळदुर्ग,दि.०५ :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केल्यानंतर
नळदुर्ग शहर व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सुमारे १ लाख १ हाजार रुपयेचा धनादेश भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अँड नितीन काळे यांच्याकडे सोमवार रोजी नळदुर्ग येथे सुपूर्द केले.
यावेळी भाजपचे नेते सुशांत भूमकर , तांडा सुधार समितीचे अशासकिय सदस्य विलास राठोड ,नळदुर्ग शहर तालुका अध्यक्ष बसवराज धरणे , ग्रामीण तालुका अध्यक्षा सौ
रंजनाताई राठोड, उपाध्यक्ष किशोर बनसोडे, माजी नगरसेवक निरंजन राठोड ,माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे ,पद्माकर घोडके , भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, पांडुरंग पुदाले , पप्पू पाटील, , माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे,पद्माकर देवळे , सचिन वाघोले, आदीजण उपस्थित होते.