न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नारायण अवचार तर उपाध्यक्षपदी सोहम बेले,आकाश बागल यांची निवड

नळदुर्ग,दि.०६  :

शहरातील शनिवारवाडा ब्राह्मण गल्ली येथील न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळाची बैठक मंडळाचे सल्लागार शरद बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत होवुन नुतन अध्यक्षपदी नारायण  अवचार,उपाध्यक्ष  सोहम बेले ,आकाश बागल, कोषाध्यक्ष प्रसन्न कुलकर्णी ,अमोल मोहरीर, सचिव  समर्थ वाले, सहसचिव आकाश मदने, लेझिम प्रमुख -अजय मोरे ,सागर थोंटे, मिरवणूक प्रमुख अमित शेंडगे, प्रविण चव्हाण, प्रमोद कुलकर्णी, अंबादास पवार, आकाश कुलकर्णी, ओम बागल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

मंडळाच्या सर्व सदस्यांनी निवड झालेल्या पदाधिका-यांचे अभिनंदन केले,गतवर्षी या मंडळाने मुलीसाठी कराटे प्रशिक्षण शिबीर,लहान मुला-मुलीसाठी वेशभूषा स्पर्धा, तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यावर्षीही गणेशोत्सव मोठया उत्साहात विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे.
 
Top