समाजवादी पार्टीच्या नळदुर्ग शहर अध्यक्षपदी माजीद आरीफ कुरेशी
नळदुर्ग,दि.१२ :
समाजवादी पार्टीच्या नळदुर्ग शहर अध्यक्षपदी माजीद आरीफ कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे. कुरेशी यांना शहराध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबुल आझमी यांनी दि.८ सप्टेंबर रोजी दिले आहे. या निवडीबद्दल कुरेशी यांचे अभिनंदन केले जात आहे.
समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी, युवा प्रदेश अध्यक्ष कृष्णा रोचकरी , जिल्हाध्यक्ष लिंगय्या स्वामी, शोएब काझी,आयाज सावकार, नळदुर्ग शहर युवा अध्यक्ष सईद बागवान, एमिल माजी कुरेशी, महंमद हुसेन कुरेशी, लईक बेग , अफझल शेख, अकबर कुरेशी यांच्यासह अनेकांनी माजीद कुरेशी यांची नळदुर्ग शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.