केसरजवळगा येथे 31 रोजी राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धासाठी  निवड चाचणी ; जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांना आवाहन

 मुरूम,दि.३०:

  सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 2025 साठी दि.31 ऑक्टोंबर रोजी केसर जवळगा (ता. उमरगा)  येथील  पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, केसर जवळगा  मैदानावर  निवड चाचणी घेण्यात येणार आहे.

या निवड चाचणीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातून राज्यस्तरीय पातळीवर खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंच्या स्पर्धेचे आयोजन  देवगिरी लॉन, वाई वाठार रोड, जोशी विहीर, ता. वाई, जि. सातारा येथे दिनांक 8 व 9 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. या निवड चाचणीचे आयोजन धाराशिव जिल्हा दांडपट्टा असोसिएशनचच्या वतीने करण्यात येणार आहे. दांडपट्टा स्पर्धेसाठी, जिल्ह्यातील इच्छुक खेळाडूंनी दांडपट्टा क्रीडाप्रकारावरील आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन दांडपट्टा धाराशिव जिल्हाअध्यक्ष डॉ प्रीती चिलोंबा व पी एम श्री जिल्हा परिषद कें प्रा शाळेचे मु अ बालाजी भोसले , सुनिल  राठोड व प्रशिक्षक महंमद रफी शेख यांच्या वतीने करण्यात आले आहे.सकाळी 8:30 ते 11:30 या वेळेत इच्छुक स्पर्धकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे
 
Top