आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या  वाढदिवसा निमित्त नळदुर्ग शहर भाजपच्या वतीने विविध ठिकाणी  निराधार बालकांना, रुग्णांना ब्लॅकेट वाटप करत अन्नदान करुन साजरा

नळदुर्ग, दि.३० : 

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार श्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या ५५ वा वाढदिवसाचे औचित्य साधून नळदुर्ग शहर भाजपच्या वतीने विविध ठिकाणी खाऊ वाटप, गरजुना, ब्लॅकेट,निराधार विद्यार्थ्यांना भोजन देवुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या  वाढदिवसा निमित्त गुरुवार दि.३० आक्टोंबर रोजी नळदुर्ग शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना सफरचंद, केळी, बिस्कीट आणि ब्लॅकेट वाटप करण्यात आले.रणे प्लाटिंग येथिल पालावरच्या शाळेत चटाई, फळे,खाऊ,व ब्लॅकेट वाटप करण्यात आले. त्याचबरोबर "आपलं घर" प्रकल्पातील अनाथ व निराधार बालकांना खाऊ देत सर्वाना भोजन देवुन ब्लॅकेट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपचे नेते सुशांत भूमकर, नळदुर्ग शहराध्यक्ष बसवराज धरणे,  नय्यर जागीरदार, शहर उपाध्यक्ष किशोर नळदुर्गकर, माजी अध्यक्ष धिमाजी घुगे, पांडू पुदाले, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, सुधीर हजारे, श्रमिक पोतदार, बबन चौधरी, सुदर्शन पुराणिक,पद्माकर घोडके, जिलानी कुरेशी, अनिल ऊर्फ पप्पू पाटील, संजय जाधव, गणेश  मोरडे, सागर हजारे, रियाज शेख, कल्पना गायकवाड, संदीप गायकवाड, विश्वास रणे, मुद्दसर शेख, सलीम बागवान, मुजू शेख, विरेंद्र बेडगे,आरिफ जहागिरदार शोभित बचाटे. आदीसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top