जगन्नाथ गोशाळेचा गोमाता पुजनाचा अनोखा उपक्रम
मुरुम,दि.३० :
मुरूम येथे श्री जगन्नाथ गोशाळेत उमरगा तालुक्यातील मौजे औराद येथील श्री.यादव विश्वंभर सूर्यवंशी यांनी आपली देशी गोवंश गोमाता श्री जगन्नाथ गोशाळेला देणगी म्हणून आणून दिली,या गोमातेचे मुरूम येथे आगमन होताच हलगी या गजरात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री जगन्नाथ गोशाळा पर्यंत ढोल ,हलगी च्या गजरात या गोमातेचे संपूर्ण मुरूम मधून मिरवणूक काढत गोमातेचे स्वागत,पूजन व औक्षण करण्यात आले.
सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रोटरी क्लब मुरूम च्यावतीने गोमातेचे पूजन करण्यात आले,यावेळी रोटरीचे अध्यक्ष अप्पासाहेब सूर्यवंशी,मल्लिनाथ बडोले,डॉ नितीन डागा,डॉ.सुधीर पंचगल्ले,सुनील राठोड,संतोष कांबळे,वाकडे सर,कल्लाप्पा पाटील,भूषण पाताळे,आदी उपस्थितीत होते,तसेच यावेळी श्री जगन्नाथ गोशाळाला गोमाता देणगी म्हणून देणारे श्री यादव विश्वंभर सूर्यवंशी यांचेही स्वागत करण्यात आले,लुटे किराणा येथे गोमाता चे आगमन होताच लुटे किराणा च्यावतीने गोमातेचे पूजन करण्यात आले,महात्मा बसवेश्वर चौक येथे अंबर हार्डवेअरच्या वतीने मंथन अंबर यांनी गोमातेचे पूजन केले तसेच सिद्याप्पा मठ येते साई किरण,मेडिकल व मुदकन्ना परिवाराच्या वतीने गोमातेचे पूजन औक्षण करण्यात आले.शेवटी श्री जगन्नाथ गोशाळा येथे सौ क्रांती सूर्यवंशी यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले या वेळी श्री जगन्नाथ गोशाळा चे निर्मलकुमार लिमये, सूरज राजपूत ,रौनक शर्मा, प्रकाश सूर्यवंशी हजर होते.