नळदुर्ग शहरात काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे अँड धिरज पाटील यांच्या हस्ते उदघाटन

नळदुर्ग,दि.२२:

नळदुर्ग शहरात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी हे पक्ष कार्यालय एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास काँग्रेसचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष अँड धिरज पाटील यांनी व्यक्त केले.


आगामी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीची  तयारीसाठी बुधवार दि. २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर  नळदुर्ग शहरात काँग्रेस पक्षाच्या  संपर्क कार्यालयाचे  उदघाटन   जिल्हा अध्यक्ष अँड धिरज पाटील यांच्या हास्ते करण्यात आले आहे.

सदरील कार्यालय  शास्त्री चौक, नळदुर्ग येथिल श्री शिवलिंगेश्वर हिरेमठ कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती काँग्रेसचे तुळजापूर तालुका अध्यक्ष रामचंद्र आलुरे , माजी नगराध्यक्ष शाहबाज काझी, अँड अरविंद बेडगे, संदीप सुरवसे, जनसेवक अमोल  कुतवळ,आबेदिन कुरेशी, रामराव  पाटील, इमाम शेख, गफूर कुरेशी, अजय बागडे, आप्पा स्वामी, अमीर शेख, धनंजय डुकरे, संजय गुंजुटे, चंद्रकांत बनसोडे, मुजमिल कुरेशी, हैदर कुरेशी, शोकत कुरेशी, आत्ताप कुरेशी, कचरू पठाण, नाना शितोळे, विजय डोंगरे, अमोल जेटिथोर, क्षितिज नरवडे, सिद्धेश्वर कस्तुरे, हरीश जाधव, विजयराव क्षिरसागर, युसुफ पटेल आदीसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते  स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 

 
Top