नळदुर्ग : शहरातील मराठा गल्लीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात ; पारायण कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन 

नळदुर्ग,दि.२३: शिवाजी नाईक 

नळदुर्ग येथील मराठा गल्ली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवार दि.२३ऑक्टोंबर रोजी पासुन श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली आहे. पारायणे हे वर्ष ४७ वेळ वर्ष आहे.

गुरुवर्य वै.श्री. शिवराम बुवा दिंडेगांवकर यांच्या आशिर्वादाने, वें.श्री. तात्यासाहेब वासकर (आवा) महाराज यांचे कृपादृष्टीने तसेच वै.ह.भ.प. मारुती महाराज कानेगांवकर यांच्या कृपेने आणि पावन नगरीतील आविकांच्या तन, मन, धन या सहकार्याने संपन्न होत आहे.

 पारायण काळातील दैनंदिन कार्यक्रम

पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ माऊलीची पुजा, ७ ते ९ सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन, ९ ते ९.३० विश्रांती, ९.३० ते ११ वाचन स. ११ ते १२ भोजन व विश्रांती, १२ ते २ महिलांचे भजन व भारुडाचा कार्यक्रम, २ ते ४.३० गाथा भजन, ४.३० ते ५.३० प्रवचन,
६ ते ७ हरीपाठ, ७ ते ८ भोजन, ८ ते १० किर्तन ११ ते ४ पहाटे हरिजागर .
प्रवचनकार
गुरूवार दि. २३/१०/२०२५ रोजी ह.भ.प. श्री. बलभिम बागल (चिकुंद्रा) यांचे प्रवचन  तर ह.भ.प.श्री. दिपक निकम महाराज (धनगरवाडी) यांचे किर्तन होणार आहे.शुक्रवार दि. २४ रोजी ह.भ.प.श्री. अशोक जाधव (गुरुजी) बाभळगांव यांचे प्रवचन तर हभप राम महाराज गायकवाड चिकुंद्रा यांचे किर्तन, शनिवार दि.२५ रोजी ह.भ.प.श्री. बाबुराव पुजारी (पाडोळी), तर किर्तन ह.भ.प.श्री. विरपाक्ष महाराज (कानेगांव), 
रविवार दि.२६ रोजी ह.भ.प.श्री. मोहन पाटील (किलजकर), ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर महाराज (माकणीकर) यांचे  सायं. ७ ते ९ किर्तन होणार आहे. सोमवार दि. २७ रोजी ह.भ.प.श्री. संजय पवार (शहापूर) यांचे प्रवचन तर ह.भ.प.श्री. गुरुवर्य आप्पासाहेव महाराज (दिंडेगावकर) यांचे किर्तन, मंगळवार दि. २८ रोजी ह भ प राजकुमार पाटील वागदरी, तर ह.भ.प.श्री. गुरुवर्य चैतन्य महाराज वासकर (वाशी)यांचे किर्तन होईल.

सांगता समारंभ बुधवार दि. २९/१०/२०२५

 बुधवार दि. २९/१०/२०३५ रोजी सकाळी ८ ते ९ पसायदान हभप. गुरुवर्य चैतन्य महाराज वासकर, काला ह भ प गुरुवर्य आप्पासाहेब दिंडेगावकर महाराज, काल्याचे कीर्तन ह भ प श्रीहरी ढेरे महाराज काक्रंबा यांचे होवुन  माऊली पालखी मिरवणूक होईल. यावेळी महाप्रसाचे कार्यक्रम होणार आहे. तरी वरील धार्मिक कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकरी, पारायण समिती, शिवशाही तरुण मंडळ नळदुर्ग यांनी केले आहे.

 
Top