नळदुर्ग नगरपालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढविण्याचा बैठकीत निर्धार 

नळदुर्ग,दि.०६ :

 होऊ घातलेल्या नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्याने मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.ही निवडणुक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर  लढविण्याची तयारी केली असून त्या संदर्भात प्रमुख पदाधिका-यांची बैठक पार पडली.

नळदुर्ग शहरात गेल्या अनेक वर्षात सातत्याने उपजिल्हा रुग्णालय,नळदुर्ग तालुका,अप्पर तहसील,रस्ते,पाणी,सोयी सुविधा,कोरोना काळात केलेल्या उपाय योजना ,बाजार समिती,शौचालय योजनेचे अनुदान,स्ट्रीट लाईट,बायपास आदीसह इतर  नागरी प्रश्न घेऊन आंदोलन,मोर्चे काढले. 

त्यामुळे या निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार सर्वच प्रभागात उमेदवार दिल्यास  अनेक ठिकाणी मोठं आव्हान उभे राहणार आहे,कारण मनसेने आतापर्यंत केलेलं काम नाकारून चालणार नाही,बाकीच्यांच्या तुलनेत मनसेच्या कामगिरीवर लोकांची सहानुभूती मिळू शकते. विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे बैठकीत ठरले. 

यावेळी बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, ॲड.मतीन बाडेवाले,सूरज चव्हाण,गणेश बिराजदार,सोमेश्वर आलूरे,आकाश पटणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top