नळदुर्ग: राजगुरू श्री शिवलिंगेश्वर हिरेमठात ६ ते १२ नोव्हेंबर कालावधीत श्री शिवलिंगेश्वर महास्वामीचा पुण्यस्मरण सोहळा होणार साजरा
नळदुर्ग, दि.०६: नोव्हेंबर
नळदुर्ग शहरातील सुप्रसिद्ध सुक्षेत्र राजगुरू श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे निर्विकल्प समाधीस्थ राजगुरू श्री. ष. ब्र. १०८ शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त दि.६ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन हिरेमठाचे मठाधीपती श्री.ष.ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले आहे.
दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजेपर्यंत श्री व्याख्यान केसरी वे. प. सोमनाथ स्वामी धोत्री यांच्या रसाळ वाणीतून अध्यात्मिक प्रवचन होणार आहे. दि.११ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता जागरण व भजन कार्यक्रमाचे आयोजन आले आहे. तसेच दि.१२ रोजी सकाळी ६ वा. महारुद्राभिषेक व दीक्षा अय्याचार हा धार्मिक विधी पार पडणार आहे. पुण्यस्मरणोत्सवाचा मुख्य सोहळा दि.१२ रोजी १० वाजता संपन्न होणार आहे .
या धर्मसभेस विविध मठांतील महास्वामीजी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये राजशेखर महास्वामीजी (विरक्त मठ, नंदगाव), जय शांतिलिंग महास्वामीजी (विरक्त मठ, हिरेनागाव), मल्लिकार्जुन महास्वामीजी (घटप्रभा), सुतरेश्वर शिवाचार्य महास्वामीजी (अचलेर), हुच्चेश्वर महास्वामीजी (हुच्चेश्वर संस्थान मठ, कमतगी), शंकर राजेंद्र महास्वामीजी (गच्चीन मठ, अमीनगड), मुरूपेंद्र महास्वामीजी (सोमशेखर मठ, मुनवळळी), शिवबसवराजेंद्र महास्वामीजी, शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी (अणदुर), गंगाधर महास्वामीजी (जेवळी), शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी (जळकोट), जयमल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी (मुरूम), अभिनव शिवलिंग महास्वामीजी (मदनहिप्परगा), विरंतेश्वर महास्वामीजी (केसरजवळगा), बसवलिंग महास्वामीजी (अक्कलकोट) तसेच हिरेमठाचे मठाधीपती बसवराज शिवाचार्य महास्वामीजी उपस्थित राहणार आहेत.