ऐन निवडणुकीत भाजपचे
संजय बताले यांचा समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
नळदुर्ग दि. ७:
नळदुर्गशहरातील माजी नगरसेवक तथा भाजपचे कार्यकर्ते संजय बताले यांनी नगरपालिका निवडणुकीत भाजपला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला जोरदार सुरुवात झाली आहे.
नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र नळदुर्ग शहरात ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. नळदुर्ग येथील जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी नगरसेवक व भाजपचे कार्यकर्ते संजय बताले यांनी आपल्या समर्थकांसह गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय बताले व त्यांच्या समर्थकांचा प्रवेश झाला आहे.
यावेळी कृषिमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख ना.दत्ता भरणे, शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, प्रदेश सचिव गोकुळ शिंदे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शफी शेख, धाराशिव जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, तुळजापूर तालुका अध्यक्ष बबलू सुर्यवंशी, पक्षाचे नळदुर्ग शहर अध्यक्ष अजित जुनोदी, समीर मोरे , उमर शेख उपस्थित होते.
संजय बताले यांच्यासमवेत नळदुर्ग शहरातील रवी महाराज राठोड, विनायक पवार जाधव, आनंद पवार, योगेश सुरवसे, बापु दुरुगकर, मुन्ना इनामदार, अॅड लखन इंगोले व इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. संजय संजय बताले व त्यांच्या समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार भरणे गटातील प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.