केंद्रीय  प्रशिक्षणार्थी अधिकारी  पथकाची नळदुर्ग नगरपालिकेस भेट

नळदुर्ग,दि.०७ नोव्हेंबर 

शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी नगरपरिषद नळदुर्ग येथे केंद्रीय प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी अधिकारी यांचे पथक नळदुर्ग शहरातील  घनकचरा व्यवस्थापन केंद्र, वृक्षारोपण स्थळ व इंदिरानगर झोपडपट्टी येथील सविस्तर पाहणी करून माहिती जाणून घेऊन सविस्तर चर्चा केली .

 त्याचबरोबर नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी यांच्यासोबत नगरपरिषद विषयक कामकाजाची सविस्तर माहिती घेऊन किल्ल्याची पाहणी करण्यात केली. यावेळी अधिकारी शहनवाज आली आय आर एम एस, सतीश मीना आय आर एम एस, सूर्यवंशी गुप्ता आयएसएस, स्नेहा राव आय एस एस, प्रियंका दूर गोपाल आयएसएस, आहाना श्रीष्ठी आयपीएस, प्रज्ञा ठाकूर आयपीटीए एफ एस, शिवम कुमार आयएफएस, जेना आयएफएस, बिलटू माजी आयएसएस तसेच मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर,नगर अभियंता रत्ननकांत पीचे, कार्यालयीन अधीक्षक खलील शेख,कर निर्धारक पल्लवी पाटील,सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड,समीर मोकाशी, रानुबाई सपकाळ, दस्तगीर जागीरदार, खंडू शिंदे , सुशांत भालेराव, विकास कांबळे, प्रेम राठोड आदी कर्मचारी उपस्थित होते.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top