सलग पाचव्यांदा नय्यर जहागिरदार विजयी होवुन हॅटट्रिक साधणार ?
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग दहा मध्ये धुमधडाक्यात प्रचार सुरु
नळदुर्ग,दि.२६ : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे, नगरसेवक पदाचे उमेदवार नय्यर जहागिरदार यासह कार्यकर्तेनी नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. १० मध्ये भाजप पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी त्यांनी पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधुन शहरात केलेल्या विकास कामाची माहिती दिली. याप्रसंगी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे प्रभाग क्र.१० मधील नगरसेवक पदाचे उमेदवार नय्यर जहागिरदार आणि साक्षी नळदुर्गकर यांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.याप्रसंगी कार्यकर्ते, पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
नय्यर जहागिरदार यांचा राजकीय प्रवास
नय्यर जहागिरदार यांनी नळदुर्ग नगरपालिका निवडणुक पहिल्यादा २००२ साली लढवुन दणदणीत विजय मिळविले. त्यानंतर दुसऱ्यादख २००७ मध्ये निवडून येवुन उपनगराध्यक्ष झाले.त्यानंतर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांनी सलग आतापर्यंत चार टर्म निवडूण आले असुन आता पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरले असुन ते विजयाची हॅटट्रिक साधणार का याबाबत नागरिकात चर्चा रंगत आहे.