सर्वांगीण विकासाबरोबर उर्दू भाषा संवर्धनासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन - महाराष्ट्र उर्दू अकॅडमीचे अध्यक्ष हसीन अख्तर
नळदुर्ग ,दि.२६ : शहरांच्या सर्वांगीण विकासाकरिता आणि उर्दू भाषा संवर्धनासाठी व भावी पिढीला उर्दू भाषाचे महत्त्व टिकविता यावे यासाठी शासनदरबारी प्रयत्न करुन निधी मिळवून देण्याचे आश्वासन देत नळदुर्ग निवडणुकीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य उर्दू अकॅडमीचे अध्यक्ष हसीन अख्तर यांनी नळदुर्ग येथे राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत केले.
शहरात मंगळवारी सायंकाळी आयोजित सभेत व्यासपिठावर राष्ट्रवादी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले, प्रभाग क्र ७ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार हाजी मुश्ताक कुरेशी, ८ चे उमेदवार अजहर जाहगीरदार, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय बताले, जेष्ठ नेते शफी शेख, अजित जुनोदी,यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना हसीन अख्तर म्हणाले की, शहरात मूलभूत सुविधा जसे की मजबूत रस्ते, स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा,दिवाबत्ती स्वछता आदी मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले, प्रभाग क्र ७ अ चे नगरसेवक पदाचे उमेदवार मुश्ताक कुरेशी ,प्रभाग क्र ८ ब चे उमेदवार समाजसेवक अजहर जाहगीरदार, संगीता कांबळे, शहाना खतीब यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी बाजार लाईन येथून रॅली काढण्यात आली . या रॅलीचे रूपांतर कोपरा सभेत झाले.याप्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले, मुश्ताक कुरेशी, अजहर जाहगीरदार, एस. के. जाहगीरदार, राष्ट्रवादी अल्पसंख्याक राज्य उपाध्यक्ष शफी शेख यांची भाषणे झाली.