शहरातील नागरिकांना सर्व मुलभूत सुविधेसह विकासाला प्राधान्य देणार -अशोक जगदाळे नळदुर्ग ,दि.२६: शहरात दररोज पाणी पुरवठा, शहर स्वच्छता, शहरातील गटरी, अंतर्गत रस्त्याची नियमित साफसफाई त्याचबरोबर शहरात वासियांचा जिव्हाळ्याचा नळदुर्ग तालुका निर्मितीच्या प्रश्नासाह बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन काँग्रेस -सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक हरिदास जगदाळे यांनी इतर नागरासेवक उमेदवारांच्या प्रचार्रार्थ आयोजित कोपरा बैठकीत दिले. तसेच शहरातील भीमनगर, बौद्ध नगर, मुळे प्लॉट्स, शिवकर वाडी, रणे प्लॅटिंग असे प्रभाग क्रमांक दहा मध्ये मंगळवार(२५) रोजी अशोक जगदाळे आणि महिला उमेदवार श्रीमती अनिता रणे,अमृत पुदाले यांच्या प्रचारासाठी पदयात्रा काढून प्रचार केला, त्यानंतर बौद्ध विहारामध्ये जाऊन तथागत गौतम बुद्धाचे दर्शन घेतले, व उपस्थित मतदाराना साथ देण्याची साद घातली. अशोक जगदाळे बोलताना पुढे म्हणाले की, नागरिकांसाठी दर्जेदार मूलभूत सोयी -सुविधा उपलब्ध करून देणार त्याचा बरोबर आठवडी बाजार, जनावर बाजारसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे सांगत काँग्रेस-शिवसेना(उबाठा ) उमेदवारांना विजय करण्यासाठी आवाहन केले. याप्रसंगी नगरध्यक्ष पदाचे उमेदवार जगदाळे सह अमृत पुदाले, अनिता रणे,धंनजय डुकरे, शाम कणकधर, ताजोद्दीन सावकार,संतोष पुदाले, रुमोद्दीन शेख, गीता पुदाले, संपदा कांबळे यांच्या सह महिला नागरिक उपस्थित होते.