बसवराज धरणे हे युवा नेतृत्व आहे. मुळात धरणे कुटुंबियांची नाळ ही फार वर्षांपासून सामाजिक कार्याशी संलग्नित अशीच आहे. १९७२ साली पडलेल्या दुष्काळात त्यांचे आजोबा स्व. बसवनप्पा सांबप्पा धरणे यांनी आपल्या शेतातली धान्य गोरं गरीबांना देवुन मदत केल्याच्या आठवणींना उजाळा दिले जात आहे . अन तिथूनच त्यांच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली आणि ती आजही चालूच आहे. सामाजिक, शैक्षणिक ,धार्मिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे सर्वश्रुत आहे.