नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना 'चिन्हाचे' वाटप

 नळदुर्ग,दि.२६ :
 
राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षांच्या उमेदवारांना नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवार(२६) रोजी  'चिन्ह' वाटप करण्यात आले, यामध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज अप्पा धरणे यांना 'कमळ', काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक जगदाळे यांना 'हात',राष्ट्रवादीचे (अजित पवार गट )संजय बताले यांना 'घड्याळ' ,राष्ट्रवादी (शरद पवार गट ) महेबूब शेख यांना 'तुतारी फुंकणारा माणूस' एमआयएम पक्षाचे उमेदवार शहबाज काझी यांना 'पतंग' त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अपक्ष उमेदवार ताजोद्दीन शेख यांना चिन्ह म्हणून 'बॅट ' मिळाले आहे.

 
तसेच नगरसेवक पदासाठी अपक्ष म्हणून उभे असलेले उमेदवार  प्र. ५ मधील काझी इल्याजबेगम जाहि्रोद्दीन यांना 'कपबशी',  प्र ५ मधील उमेदवार काझी शोएब इरफान यांना 'छताचा पंखा', प्र. क्र १० मधील बनसोडे महादेवी अशोक यांना 'कपबशी ', प्र. १० मधील बागडे अजयकुमार सदाशिव यांना 'रोड रोलर ',वंचित बहुजन आघाडीला 'गॅस सिलेंडर'आणि शिवसेना (उबाठा) यालस मशाल असे चिन्हाचे वाटप निवडणूक विभागाने केले आहे. बुधवार रोजी नगरपालिका कार्यालयात निवडणूक कक्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाटप केले. यावेळी उमेदवारासह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

 
Top