विकासाची घौडदौड सुरु ठेवण्यासाठी नागरिक भाजप-शिंदे सेनेच्या पाठीशी - नगराध्यक्षपदाचे उमेदवार बसवराज धरणे 


नळदुर्ग,दि.२७:
 
शहरातील नागरिकांनी भाजपने केलेल्या  विकास कामाची गती पाहिली आहे. आणि या विकासाची घौडदौड सुरु ठेवण्यासाठी निश्चितच मतदार भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असल्याचे भाजप -शिंदे सेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे यांनी कोपरा बैठकीत विश्वास व्यक्त केला.


निवडणुक प्रचारासठी नळदुर्ग शहरात पदयात्रा, कोपरा बैठकीचा धडाका सुरु आहे. बुधवारी व्यासनगर मध्ये प्रभाग क्रमांक २,३ आणि इतर प्रभागात कोपरा बैठकीत बसवराज धरणे भाजप - सेना उमेदवारांच्या  प्रचारार्थ आयोजित बैठकीत  बोलत होते.



नळदुर्ग शहरात अनेक विकासाची कामे होत असून यात मुखत्वे पाणी पुरवठा योजनेचे काम व त्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या टाक्याचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर  आहे. त्यामुळे नळदुर्ग शहराला आता नियमित पाणीपुरवठा होणार आहे. त्यात अनेक भागात रस्ते, गटारी याचे कामे झाली . अनेक भागात आमदार राणाजगजितसिंह  पाटील यांच्या माध्यमातून आरो प्लॅट उभे केले गेले. येणाऱ्या काळातही शहरात अनेक भागात विकासाची कामे केली जाणार आहेत. यासाठी आमदार पाटील यांच्या सहकार्याने निधीची कमतरता भासू देणार नाही. शहरातील नागरिकांनी याचे देही, याचे डोळा हे होत असलेली कामे पाहिली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जनता कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीर पने उभी राहील असे प्रतिपादन भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे यांनी केले.


याप्रसंगी नय्यर जागीरदार शिवाजी व-हाडे, साहेबराव घुगे ,सुनील उकंडे ,दीपक आलुरे ,दत्तात्रेय दासकर आदीसह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास विलास राठोड, दत्ता राजमाने, भिमाजी घुगे ,श्रमिक पोतदार उमेदवार  सुमन ठाकूर, मिनाक्षी काळे,शंकर वाघमारे कार्यकर्ते, नागरिक आदी उपस्थित होते.

 
Top