नळदुर्ग नगरपालिका निवडणुक कर्तव्यास २७५ अधिकारी- कर्मचारी ; निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी 
 
नळदुर्ग,दि.२७ : शिवाजी नाईक 


 नळदुर्ग नगरपालिका निवडणुक प्रक्रियेत 
विविध १७ कक्षमध्ये २७५ अधिकारी- कर्मचारी निवडणूक कर्तव्यात व्यस्त आहेत.यामध्ये पाटबंधारेचे सहाय्यक अभियंता,शिक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी विभाग, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आदीचा समावेश आहे.


नळदुर्ग नगरपालिका  निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नगरपालिका प्रशासन, पाटबंधारे विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग असे विविध प्रशासकीय विभागातील २७५ अधिकारी - कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्यात व्यस्त आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर तहसीलदार प्रमोद गायकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय  अधिकारी तथा मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर व त्यांना सहाय्यक म्हणून पल्लवी पाटील या मदत करीत आहेत.तसेच त्यांच्या आधिपत्त्याखाली विविध कक्ष स्थापन करून कार्य करण्यात येत आहे. यातील निवडणुकीतील नामनिर्देशन कक्ष प्रमुख, निवडणूक कक्ष प्रमुख, दैनंदिन अहवाल कक्ष प्रमुख म्हणून कर निर्धारण अधिकारी पल्लवी पाटील या धुरा सांभाळत आहेत. तर मतदान केंद्र मूलभूत सुविधा प्रमुख, संपर्क आराखडा सेक्टर कक्ष व  ईव्हीएम कक्ष प्रमुख म्हणून नगर अभियंता रत्नाकर पिच्छे हे काम पाहत आहेत.
क्षेत्रिय अधिकारी म्हणून पाटबंधारेचे सहाय्यक अभियंता रमेश टोकलवाड, स्थापत्य अभियंता व्ही पी माने, तर राखीव म्हणुन धरित्री विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल धामशेट्टी,वाहन परवाना कक्ष प्रमुख खलील शेख, वाहन व्यवस्था प्रमुख अंकुश माने, निवडणुक साहित्य प्रमुख देवानंद कांबळे, निवडणूक ओळखपत्र विभाग सौ.सपकाळ, पोस्टल बॅलेट कक्ष विश्वजीत होळकर, दिव्यांग सोयी-सुविधा दिपक काशीद, कर्मचारी नेमणूक कक्ष प्रमुख तहा मसुद इनामदार, मतदार जनजागृती कक्ष सौदागर चंद्रकांत, मीडिया कक्ष प्रमुख दिक्षा क्षीरसाठ आदी काम पाहत आहेत.प्रत्येक विभागाच्या दिमतीला दोन ते चार कर्मचारी आहेत.


🔶स्थिर पथक ,भरारी पथक तैनात🔶 


पोलीस प्रशासन सह निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी स्थिर संरक्षण पथकाचे सहा पथक कार्यरत आहेत. यामध्ये तीन पथक दिवसाठी तर तीन पथक रात्रीसाठी कार्यरत आहेत. मत पेटी  ईव्हीएम 
सिलिंग कक्ष ५ अधिकारी व २० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. तसेच एका बूथवर एक अधिकारी आणि पाच कर्मचारी तैनात असणार आहेत व २५ कर्मचाऱ्यांना राखीव म्हणून ठेवणार आहेत.


नळदुर्ग नगरपालिका  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २७५ कर्मचाऱ्यांची निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक करण्यात आली आहे.पालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी निवडणूक कामासाठी व्यस्त आहेत, होते. परिणामी, पालिकेत ज्यादा  मनुष्यबळामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत होता. ते कमी होणार आहे, दरम्यान ३ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यांनतर अनेक निवडणूक कामातून मुक्त करण्यात येणार आहे. मात्र निकालानंतरही अनेक कामे पूर्ण करण्यासाठी कर्मचारी निवडणूक कर्तव्यार्थ तैनात राहण्याची शक्यता आहे.एकूणच निवडणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान मतमोजणी जि. प.  (मुलांची ) प्रशाला येथे होणार असून मतमोजणी पर्यवेक्षक ५, मतमोजणी सहाय्यक ५ तर नियंत्रण अधिकारी ४ आणि मदतनीस म्हणून ५ जणाचा समावेश आहे.

 
Top